Skip to content
Vasundhara Samruddhi Foundation Logo - Nature Protected Life Enriched

वसुंधरा समृद्धी फाउंडेशन

एकच लक्ष, निसर्ग समृद्ध भारत

  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • कार्यकारिणीExpand
    • कार्यकारिणी मंडळ
    • जिल्हा/तालुका कार्यकारिणी
  • उपक्रम
  • मदत करा
  • ब्लॉग
  • प्रसिद्धी आणि पुरस्कार
  • संपर्क साधा
Vasundhara Samruddhi Foundation Logo - Nature Protected Life Enriched
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन
एकच लक्ष, निसर्ग समृद्ध भारत

आम्ही हे कार्य का करतो?

“वसुंधरा ही पूर्वजांची देणगी नव्हे, ती उद्याच्या पिढ्यांचा हक्क आहे.
तिला हिरवीगार, समृद्ध आणि शाश्वत ठेवणं हेच आपलं कर्तव्य आहे.
निसर्गाचं जतन करू, संपन्नता वाढवू आणि चला तर सजीव सृष्टीचे तसेच मानवजातीचे रक्षण करूया”

ध्येय, धोरण आणि आमचे लक्ष

१. आमचे ध्येय (Our Vision)

निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. झाडे हीच पृथ्वीची खरी संपत्ती असून, ती आपल्याला शुद्ध हवा आणि जगण्यासाठी ऊर्जा देतात यावर आमचा ठाम विश्वास आहे.

येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित आणि समृद्ध भविष्य देण्यासाठी आज वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. “वृक्ष हीच खरी संपत्ती, निसर्ग हीच खरी समृद्धी” हा विचार केवळ शब्दांत न मांडता, तो प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

२. आमचे धोरण (Our Strategy)

स्वदेशी वृक्षांना प्राधान्य:आम्ही इकोसिस्टमचा समतोल राखण्यासाठी विदेशी झाडांऐवजी कडुनिंब, पिंपळ, वड, जांभूळ इत्यादी यांसारख्या स्थानिक प्रजातींच्या लागवडीवर विशेष भर देतो.
शहरी वनीकरण: मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या अनेक महानगरांमध्ये ‘ग्रीन बेल्ट’ विकसित करणे, तसेच रस्ते, शाळा आणि औद्योगिक वसाहतींमध्ये वृक्षारोपण करून शहरांना प्रदूषणमुक्त करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

३. आमचे लक्ष (The Target)

पर्यावरण संतुलन: वाढत्या कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्राणवायूचे (Oxygen) प्रमाण संतुलित राखण्यासाठी ४५% ते ५०% हरित आच्छादन (Green Cover) असणे ही काळाची गरज आहे.

  • पुढील काही वर्षांत ५० ते १०० कोटी झाडे लावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
  • आम्ही केवळ वृक्षारोपण करण्यावर थांबत नाही, तर लावलेली झाडे जगवणे आणि त्यांचे संगोपन करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी मानतो. आमचा भर “वृक्ष लागवडी” पेक्षा “वृक्ष जगवण्यावर” अधिक आहे.

आमची प्रमुख कार्यक्षेत्रे

वसुंधरा समृद्धी फाउंडेशनची विविध सामाजिक अंगे

🤝

सामाजिक कल्याण

🌳

पर्यावरण

📚

शिक्षण

⚡

नैसर्गिक साधनसंपत्ती व ऊर्जा संवर्धन

🚜

कृषी

🏆

क्रीडा, संस्कृती व युवक

❤️

आरोग्य

👩‍👦

महिला व बालकल्याण

आमची कार्यपद्धती

कृती प्रथम

बोलण्यापेक्षा कृतीतून बदल घडवतो..

पारदर्शकता

काम, खर्च आणि परिणाम — सर्व स्पष्टपणे मांडतो.

समुदाय सहभाग

स्थानिक लोकांसोबत हातात हात घालून काम करतो.

आजची परिस्थिती: एक गंभीर आव्हान

२०० झाडे

भारताची लोकसंख्या १४५ कोटींच्या (१.४५ अब्ज) वर पोहोचली आहे, परंतु दुर्दैवाने भारतात प्रत्येक व्यक्तीमागे सरासरी २०० झाडे उरली आहेत. जागतिक सरासरीच्या तुलनेत ही आकडेवारी चिंताजनक असून, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे प्रमाण प्रतिव्यक्ती ५००+ झाडे असणे काळाची गरज आहे

निसर्गाचा इशारा: आज आपण अशा वळणावर उभे आहोत जिथे निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. ४५°C पार केलेले तापमान, अनपेक्षित अतिवृष्टी आणि विनाशकारी महापूर ही निसर्गावरील मानवी अतिक्रमणाचीच फळे आहेत.

अस्तित्वाचा लढा: अनिर्बंध जंगलतोड आणि वाढत्या प्रदूषणामुळे केवळ पर्यावरणाचा ऱ्हास होत नसून, संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जर आपण आजही जागे झालो नाही, तर भविष्यातील संकटे अधिक भयावह असतील.

जागतिक जंगलामधील भारताचे स्थान

देश (Country) जागतिक जंगलातील हिस्सा (%)
🇷🇺 रशिया (Russia) 20%
🇧🇷 ब्राझील (Brazil) 12%
🇨🇦 कॅनडा (Canada) 9%
🇺🇸 अमेरिका (America) 7%
🇨🇳 चीन (China) 5.6%
🇮🇳 भारत (India) – ९ वे स्थान 1.8%

कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड 45% ते 50% असणे आवश्यक आहे.
( अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट (GFRA) २०२५ अहवालानुसार )

गंभीर वास्तव: भारतातील वृक्षतोड आणि संकटे

🚨 ताजी आकडेवारी (२०२५)

Global Forest Watch च्या ताज्या अहवालानुसार, भारताने २०२५ मध्ये सुमारे १,४०,००० हेक्टर (१४० kha) नैसर्गिक जंगल गमावले आहे.

प्रमुख कारणे: रस्ते विकास, खाणकाम आणि शहरीकरणासाठी होणारी वृक्षतोड. तसेच ‘वणवे’ (Forest Fires) हे मोठे संकट ठरत आहेत.

🔥

हजारो ‘फायर अलर्ट’

२०२५-२६ या काळात भारतात विक्रमी वणव्यांच्या घटनांची नोंद झाली आहे.

वृक्षतोडीचे भयावह परिणाम

🌡️

१. ‘हीट वेव्ह’ आणि तापमान

• झाडांची संख्या कमी झाल्यामुळे भारतातील शहरांचे तापमान दरवर्षी वाढत आहे.
• सिमेंटच्या जंगलांमुळे शहरे ‘उष्णतेची बेटे’ (Heat Islands) बनत आहेत. • यामुळे शहरी भागाचे तापमान दरवर्षी भयावह रीतीने वाढत आहे.

🌧️

२. पावसाचे बिघडलेले चक्र

• झाडे बाष्पोत्सर्जनाद्वारे (Transpiration) वातावरणात ओलावा सोडतात, ज्यामुळे ढग तयार होण्यास मदत होते.
• झाडे कमी झाल्याने अनियमित पाऊस, अतिवृष्टी किंवा पावसाळ्यातही कोरडा दुष्काळ अशा हवामान बदलाच्या संकटांची तीव्रता वाढली आहे.
• पावसाचे दिवस कमी झाले आहेत, पण पावसाची तीव्रता वाढल्यामुळे पिकांचे आणि मालमत्तेचे नुकसान होत आहे.

🐅

३. मानव-प्राणी संघर्ष

• जेव्हा आपण जंगले तोडतो, तेव्हा वन्यप्राण्यांचे (बिबट्या, हत्ती, माकडे) घर नष्ट होते.
• अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शहरांकडे वळत आहेत.
• यामुळे मानव-प्राणी संघर्ष वाढून दोघांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

इतर गंभीर धोके

  • 📉 मातीची धूप व सुपीकता कमी होणे
  • 🌫️ हवेची खालावलेली गुणवत्ता (Air Pollution)
  • 💧 भूजल पातळीत झालेली मोठी घट (Groundwater Depletion)

⚠️ वृक्षारोपणातील उणिवा

दरवर्षी पावसाळ्यात करोडो रोपे लावली जातात, पण त्यापैकी ५०% ते ७०% रोपे वर्षभराच्या आत मरतात.

• वृक्षारोपण हा फक्त एक इव्हेंट किंवा फोटो काढण्यापुरता कार्यक्रम उरला आहे.
• झाड लावल्यानंतर त्याच्या संरक्षणाची (तटबंदी), पाण्याची आणि संगोपनाची जबाबदारी कोणीही घेत नाही.
• जर आपण झाड जगवू शकत नसू, तर ते लावणे हा केवळ संसाधनांचा अपव्यय आहे.

भारताचे राष्ट्रीय वन धोरण १९८८

National Forest Policy, 1988

🏞️

मैदानी प्रदेश

मैदानी भागात किमान २०% जंगल असणे गरजेचे आहे.

⛰️

डोंगराळ प्रदेश

जमिनीची धूप रोखण्यासाठी आणि निसर्गाचा तोल सांभाळण्यासाठी पर्वतीय भागात हे प्रमाण ६७% इतके जास्त असावे लागते.

🎯

राष्ट्रीय लक्ष्य

एकूण भूभागाच्या ३३% भाग वनक्षेत्र असणे आवश्यक.

हे प्रमाण का महत्त्वाचे आहे?

🌬️

शुद्ध हवा

पुरेसे जंगल असेल तरच वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडचे शोषण होऊन ऑक्सिजनचे प्रमाण टिकून राहते.

☁️

पावसाचे चक्र

बाष्पोत्सर्जनाद्वारे ढग निर्मिती आणि पाऊस पाडण्यात झाडांची मोठी भूमिका असते.

💧

भूजल पातळी

जंगलांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते, ज्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी वाढते.

🦚

जैवविविधता

विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या अस्तित्वासाठी हे किमान प्रमाण आवश्यक आहे.

झाडे लावल्याने पूर कसे टाळता येतील?

  • 🏝️ झाडे पावसाच्या पाण्याचा वेग अडवून ते जमिनीखाली मुरवतात, ज्यामुळे पाणी वाहून न जाता भूजल पातळी वाढते.
  • 🌴 झाडांची मुळे माती घट्ट पकडून ठेवतात, परिणामी जमिनीची धूप थांबते आणि नद्यांची पात्रे गाळाने उथळ होत नाहीत.
  • 🌲 घनदाट वृक्षवल्ली पुराच्या पाण्यासाठी नैसर्गिक भिंत म्हणून काम करते आणि पाण्याचा विनाशकारी वेग कमी करते.
  • 🌳 आम्ही विदेशी झाडांना स्वदेशी झाडांचा (नीम, पिंपळ, वड, कडुनिंब) पर्याय देतो.

आमची कार्यपद्धती: वैज्ञानिक आणि शाश्वत उपाय

ह्या सर्व अडचणींचा विचार करता आमची वसुंधरा समृद्धी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य खालील प्रमाणे कार्य करते:

🛡️

१. ‘वृक्षारोपण’ कडून ‘वृक्षसंवर्धना’कडे

(Shift to Survival)

• केवळ झाडे लावण्याची संख्या मोजण्याऐवजी, ‘जगवलेल्या झाडांची संख्या’ हा आमचा मुख्य उद्देश आहे.
• झाड लावणे सोपे आहे, पण ते जगवणे हीच खरी देशसेवा आहे.

🌳

२. स्थानिक वृक्षांना प्राधान्य

(Native Species Only)

• निलगिरी किंवा विदेशी झाडांऐवजी भारतीय हवामानाला अनुकूल वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच, आंबा आणि जांभूळ यांसारखी झाडे लावण्यावर आमचा भर आहे.
• ही झाडे जास्त ऑक्सिजन देतात, दीर्घकाळ जगतात आणि पक्ष्यांना हक्काचा आसरा देतात.
• म्हणून स्थानिक वृक्षांना प्राधान्य देऊन त्यांची लागवड करून त्यांचे संवर्धन करणे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

🎋

३. ‘मियावाकी’ वनीकरणाचा वापर

(Miyawaki Forests)

• शहरी भागात जिथे जागा कमी आहे, तिथे मियावाकी पद्धतीमुळे झाडे १० पट वेगाने वाढतात आणि ३० पट जास्त दाट होतात.
• कमी जागेत जास्त ‘हरित क्षेत्र’ निर्माण करण्याचा हा सर्वात प्रभावी आणि वैज्ञानिक मार्ग आहे.
• म्हणून ही कार्य पद्धती वापरणे गरजेच आहे.

चला एक पाऊल निसर्ग संवर्धन कडे टाकू या…

निसर्ग वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

● झाडे लावण्याचा व जपण्याचा
● पाणी व इंधन वाचवण्याचा
● प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा
● नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा

लक्षपूर्तीचा तुलनात्मक आराखडा

तपशील (Particulars) सध्याची स्थिती गरजेची स्थिती
वार्षिक लागवड (Annual) ८० ते १०० कोटी २०० कोटी
दररोजची लागवड (Daily) २२ ते २७ लाख ५५ लाख
जगण्याचे प्रमाण (Survival) ३०% ते ४०% ८०% पेक्षा जास्त

वरील तक्त्याची गरजेची स्थिती पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही हे कार्य करतो.

“कर्म करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे”

सहभागी व्हा!

छोटे काम, मोठे बदल.

आज लावलेले एक छोटेसे रोप उद्या संपूर्ण गावाला प्राणवायू देईल. चला तर मग आपण सर्व जण मिळून वसुंधरा समृद्धी फाउंडेशनला साथ देऊया.

सहभागी व्हा देणगी द्या

⚠️ "भारताच्या मातीचा श्वास कोंडतोय... चला, तिला पुन्हा हिरवेगार करूया!"

❗ विनाशाचे वास्तव:

भारतात दरवर्षी १५ ते २० कोटी झाडे तोडली जात आहेत. वाढते सिमेंटचे रस्ते आणि शहरांमुळे आपल्या निसर्गाचा समतोल ढासळत आहे. जर आपण आज झाडे लावली नाहीत, तर उद्याच्या पिढीला केवळ कडक उन्हाळा आणि शुद्ध हवेचा तुटवडा अनुभवायला मिळेल.

🌿 आमचा संकल्प:

तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक एका झाडाच्या बदल्यात १० नवीन झाडे उभी करायची आहेत. वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भारतीय वृक्षांची लागवड करत आहोत.

💚 "आपल्या हातांनी लावलेले एक झाड, देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे!"

🌱 आताच आमच्या वृक्षारोपण मोहिमेत

सामील व्हा
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • कार्यकारिणी
    • कार्यकारिणी मंडळ
    • जिल्हा/तालुका कार्यकारिणी
  • उपक्रम
  • मदत करा
  • ब्लॉग
  • प्रसिद्धी आणि पुरस्कार
  • संपर्क साधा

Vasundhara Samruddhi Foundation, Maharashtra

निसर्ग जपला तरच जीवन समृद्ध होईल. आम्ही शाश्वत पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कल्याणासाठी कटिबद्ध आहोत.

Reg No: E-0014057

महत्त्वाचे दुवे

  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • उपक्रम
  • ब्लॉग

मदत करा

  • स्वयंसेवक बना
  • देणगी द्या
  • FAQ (प्रश्न)
  • संपर्क साधा

संपर्क

डी/104, अमरदीप को-ऑप सोसायटी, प्लॉट 24, सेक्टर 4, कळंबोली, पनवेल, महाराष्ट्र - 410218.

📞 +91 9096534618

✉️ info@vsf.org.in

© 2026 Vasundhara Samruddhi Foundation, Maharashtra | Designed & Maintained by Atooba.com

Privacy Refund Terms & Conditions
देणगी द्या