आमचे उपक्रम
Our Initiatives
वसुंधरा समृद्धी फाउंडेशनचे उपक्रम हे फक्त झाडे लावण्यापुरते मर्यादित नाहीत, तर निसर्गाशी नाते जपण्याचा एक संकल्प आहेत. आम्ही शाश्वत विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात सक्रिय आहोत.
प्रमुख कार्यक्षेत्रे (Major Focus Areas)
पर्यावरण
वृक्षारोपण, जलसंधारण, प्रदूषण नियंत्रण व स्वच्छता मोहीमा.
सामाजिक कल्याण
गरीब, अनाथ, वृद्ध व वंचित घटकांना आधार व सहाय्य.
शिक्षण
शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, मार्गदर्शन व कौशल्यविकास.
आरोग्य
आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान, स्वच्छता व जनजागृती.
महिला व बाल कल्याण
महिला सक्षमीकरण, स्व-रोजगार प्रशिक्षण, बालसंवर्धन.
युवक सक्षमीकरण
ग्रामीण क्रीडा प्रोत्साहन, सांस्कृतिक कार्यक्रम, युवकांना मार्गदर्शन.
कृषी
नैसर्गिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन.
आपत्ती व्यवस्थापन
पाणी, जंगल व जमीन संवर्धन, आपत्ती काळातील मदतकार्य.
आम्ही केलेले उपक्रम (Our Past Initiatives)
निसर्ग सेवेचा नवा आदर्श!
वाढदिवसानिमित्त केक कापण्याऐवजी वृक्षारोपणाचा नवा संकल्प करून
‘श्री. उत्तम शिंदे’ यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्याने वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत आहेत.
शाळा, ग्रामपंचायती आणि स्थानिक युवकांना एकत्र करून पर्यावरण जागृती अभियान राबवण्यावर त्यांचा भर असतो.
आदर्श पुरस्कार २०२५
पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवर्धनासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘श्री. उत्तम शिंदे’ यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली आमची संस्था निसर्ग समृद्धी आणि संवर्धनाचे कार्य अविरतपणे करत आहे.
आमच्या चळवळीत सहभागी व्हा
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन ही केवळ एक संस्था नसून पर्यावरणासाठी उभी राहिलेली एक लोकचळवळ आहे. आम्ही ग्रामपंचायती, शाळा आणि स्थानिक संस्थांना जोडून ‘हरित भारत’ निर्मितीसाठी प्रयत्नशील आहोत. निसर्ग जपला तरच जीवन समृद्ध होईल, या ध्येयाने आमच्याशी जोडून घ्या आणि भविष्यासाठी एक हरित वारसा निर्माण करा.
