वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Frequently Asked Questions (FAQ)
निसर्ग संवर्धन आणि फाउंडेशनच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती.
निसर्ग जपला तरच जीवन समृद्ध होईल, या विश्वासाने हरित महाराष्ट्र घडवण्यासाठी आमची स्थापना झाली आहे.
पारदर्शकता, लोकसहभाग आणि शाश्वत निसर्ग संवर्धन ही आमची मुख्य तत्त्वे आहेत.
आपल्या पुढच्या पिढीला शुद्ध हवा आणि पाणी मिळावे यासाठी आपण आज लावलेली झाडे म्हणजे आमचा ‘हरित वारसा’ होय.
आमचा लोगो निसर्ग आणि मानवाचे नाते तसेच समृद्ध पर्यावरणाचे प्रतीक आहे.
कारण हे कार्य केवळ एका संस्थेचे नसून, प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होणे आवश्यक आहे असे आम्ही मानतो.
प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही मोठ्या प्रमाणावर लागवड करतो, परंतु संवर्धनाचे काम वर्षभर सुरू असते.
नाही, आम्ही शाळा, ग्रामपंचायतीच्या जमिनी आणि गायरान जमिनींवरही वृक्षारोपण करतो.
हे उपलब्ध जागा, आर्थिक मदत आणि स्वयंसेवकांच्या संख्येवर अवलंबून असते, आम्ही हजारो झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
आमच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया पेजद्वारे आम्ही आगामी मोहिमांची माहिती देतो.
आरामदायक कपडे, टोपी आणि पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक आहे; इतर साधने फाउंडेशन पुरवते.
वड पिंपळ कडूलिंब आंबा करंज इत्यादी अनेक नाना प्रकारची झाडे ही देशी झाडांमध्ये येतात.
विदेशी झाडे जमिनीतील पाणी जास्त शोषून घेतात आणि स्थानिक पक्षी-प्राण्यांसाठी उपयुक्त नसतात.
कडुनिंब हवा शुद्ध करतो, तर पिंपळ जास्तीत जास्त ऑक्सिजन देते आणि असे नाना प्रकारचे झाडे ही वेगळे वेगळे प्रकाराचे औषध देतात आणि आपले जीवन समृद्ध करतात.
स्थानिक कीटक, पक्षी आणि प्राणी केवळ देशी झाडांवरच अवलंबून असतात.
वड आणि पिंपळ यांसारखी झाडे शेकडो वर्षे जगून पर्यावरणाचे रक्षण करतात.
झाडाच्या प्रकारानुसार साधारणपणे १.५ ते २ फूट खोल खड्डा खणला जातो.
आम्ही केवळ नैसर्गिक आणि सेंद्रिय खतांचा (शेणखत) वापर करतो.
झाड मोठे झाल्यानंतर त्याला जागा मिळावी यासाठी १० ते १५ फूट अंतर ठेवले जाते.
होय, मुळांची पकड मजबूत होण्यासाठी लागवडीनंतर लगेच पाणी दिले जाते.
गरज भासल्यास स्थानिक मातीचा प्रकार तपासून त्या जमिनीला पूरक झाडांची निवड केली जाते.
स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने टँकरद्वारे किंवा ठिबक सिंचनाची आधुनिक पद्धत वापरून किंवा पाण्याची टाकी उभी करून संपूर्ण पाण्याची व्यवस्था ही केली जाते.
आम्ही कडुनिंबाच्या अर्कासारखी नैसर्गिक कीडनाशके वापरतो.
झाडांवरती बांबूची किंवा लोखंडी पिंजरे किंवा हिरवी जाळी बसवून त्यांचे संरक्षण केले जाते.
झाड स्वतःच्या पायावर उभे राहेपर्यंत (साधारण ३ वर्षे) आम्ही त्याची काळजी घेतो.
गावकरी झाडांना पाणी देणे आणि त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतात.
होय, तुम्ही फाउंडेशनच्या मोहिमेत सामील होऊन किंवा स्वतःच्या परिसरात झाड लावून सुरुवात करू शकता.
नाही, सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे.
तुम्ही झाडाचे पालकत्व स्वीकारून त्याची पूर्ण जबाबदारी घेऊ शकता.
आमच्या ‘सहभागी व्हा’ पेजवर जाऊन फॉर्म भरावा.
नक्कीच, तुमच्या सामाजिक हरित कार्याचे फोटो आम्हाला पाठवा, आम्ही ते प्रसिद्ध करू.
पर्यावरण जागृती अभियान, स्पर्धा आणि प्रत्यक्ष वृक्षारोपण प्रात्यक्षिक.
सोप्या भाषेत आणि खेळांच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले जाते.
मुख्याध्यापकांनी फाउंडेशनशी संपर्क साधल्यास आम्ही मोहीम आखू शकतो.
होय, सक्रिय सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र दिले जाते.
विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे धडे देऊन ते मोठी मदत करू शकतात.
तुम्ही तुमच्या वयाइतकी किंवा किमान एक झाड लावून संकल्प करू शकता.
होय, ही एक अविस्मरणीय आणि निसर्गपूरक आठवण ठरू शकते.
होय, विशिष्ट नियमावलीनुसार आठवण म्हणून पाटी लावण्याची सोय केली जाते.
होय, दिवाळी किंवा गुढीपाडव्याला वृक्षारोपण करण्यास आम्ही प्रोत्साहन देतो.
संबंधित व्यक्ती रोपांचा आणि खतांचा खर्च देणगी स्वरूपात करू शकते.
सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करताना ग्रामपंचायतीची लेखी परवानगी आवश्यक असते.
सरपंचांनी गावकऱ्यांना एकत्र करून मोहिमेचे नेतृत्व करावे अशी आमची अपेक्षा असते.
विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर झाडांसाठी केला जातो.
युवक झाडांच्या खणण्यापासून ते देखभालीपर्यंत सर्व कामात मदत करू शकतात.
फळझाडे लावल्यास भविष्यात गावाला आर्थिक उत्पन्नही मिळू शकते.
एक मोठे झाड दिवसाला दोन ते चार लोकांसाठी पुरेसा ऑक्सिजन देते.
झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि पृथ्वीचे तापमान कमी करतात.
झाडांची पाने हवेतील धुलीकण शोषून घेऊन हवा शुद्ध करतात.
देशी झाडांमुळे पक्ष्यांचा अधिवास वाढून जैवविविधता सुधारते.
होय, बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळे झाडे ढग खेचून आणण्यास मदत करतात.
झाडांची मुळे जमिनीला सच्छिद्र बनवतात, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते.
होय, वृक्षारोपण केलेल्या भागात भूजल पातळीत लक्षणीय वाढ होते.
दीर्घकाळासाठी वृक्षारोपण हा नैसर्गिक जलसंधारणाचा सर्वोत्तम मार्ग आहे.
सध्या आमचा भर वृक्षारोपणाद्वारे नैसर्गिक जलसंधारणावर आहे.
आम्ही कमी पाण्यात झाडे कशी जगवावी याचे गावकऱ्यांना मार्गदर्शन करतो.
होय, तुम्ही देशी रोपे नर्सरीतून घेऊन फाउंडेशनला सुपूर्द करू शकता.
होय, फाउंडेशन पारदर्शकपणे सर्व देणग्यांची माहिती आणि हिशोब ठेवते.
होय, आमचे पेमेंट गेटवे सुरक्षित असून तुमची माहिती गोपनीय राहते.
होय, तुम्ही एखाद्या विशिष्ट गावातील वृक्षारोपणासाठी निधी देऊ शकता.
होय, वृक्षारोपणासाठी लागणारी साधने (उदा. कुदळ, पिंजरे) आम्ही स्वीकारतो.
नाही, तुम्ही तुमच्या उपलब्ध वेळेनुसार उपक्रमात सहभाग घेऊ शकता.
होय, वृक्षारोपणाची शास्त्रोक्त पद्धत कशी असावी याचे मार्गदर्शन केले जाते.
होय, कॉर्पोरेट किंवा संस्थांच्या टीमसाठी आम्ही विशेष मोहिमा राबवतो.
होय, सक्रिय सहभाग घेणाऱ्या स्वयंसेवकांना फाउंडेशनतर्फे गौरवले जाते.
होय, आमचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे ही सुद्धा मोठी सेवा आहे.
गावोगावी सभा, शालेय मार्गदर्शन आणि माहितीपत्रकांचे वाटप केले जाते.
आम्ही संवादातून झाडांच्या संरक्षणाबद्दलची अनास्था दूर करण्याचा प्रयत्न करतो.
नाही, आम्ही रोपे वाटप नाही करत, परंतु ती लावण्याची और जगवण्याची जबाबदारी देतो.
आम्ही फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्रामद्वारे व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून, निसर्ग रक्षणाचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो.
होय, आमचे मार्गदर्शक विविध कार्यक्रमांत व्याख्याने देऊन प्रबोधन करतात.
महाराष्ट्रभरातील गावांमध्ये १ लाख देशी झाडे लावून ती यशस्वीरीत्या जगवणे.
होय, दर्जेदार देशी रोपे सहज उपलब्ध होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
होय, प्रत्येक लावलेल्या झाडाचे लोकेशन ट्रॅक करण्याचा आमचा मानस आहे.
शेतकऱ्यांनी बांधावर झाडे लावून उत्पन्न मिळवावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत.
सध्या आमचे पूर्ण लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासावर केंद्रित आहे.
